‘जाणून घ्या’ एकदाही निवडणूक न हरलेल्या अमित शहांचा प्रवास

0
Top Add

Inside Ad

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शहा आज २२ ऑक्टोबरला ५६ वर्षांचे झाले आहेत. अमित शहा यांचे पूर्ण नाव अमित अनिलचंद्र शहा आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. राजकारणात येण्यापूर्वी ते प्लास्टिक पाईप्सचा कौटुंबिक व्यवसाय हाताळत होते.

१९८७ साली वयाच्या २३ व्या वर्षी शहांचे लग्न झाले होते. अमित शहा यांच्या पत्नीचे नाव सोनल शहा आहे. त्यांना जय शहा नावाचा एक मुलगा आहे. अमित शहा आपल्या राजकीय कारकीर्दीत एकही निवडणूक हरले नाहीत. आज आम्ही तुम्हाला त्याच्या वाढदिवशी असे काही दुर्मिळ फोटो दाखवित आहोत.

१९८७ मध्ये अमित शहा यांचे वयाच्या २३ व्या वर्षी लग्न झाले होते. त्यांच्या पत्नीचे नाव सोनल शहा आहे. सोनल शहानेही आपला पत्नी अमित शहा यांना आदर्श पत्नीप्रमाणेच प्रत्येक चांगल्या आणि वाईट वेळेत पाठिंबा दिला.

भाजपाच्या अतुलनीय यशामागे अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. १९८२ मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींची पहिल्यांदा भेट घेतली. तेव्हा ते अहमदाबादच्या महाविद्यालयात शिकत होते तर त्यावेळी मोदी संघ प्रचारक होते. १९८६ मध्ये ते भाजपामध्ये दाखल झाले.

१९९० च्या दशकात नरेंद्र मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रेमध्ये मोठी भूमिका निभावली. तेव्हा अमित शहाही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

हा फोटो गांधीनगर १९९१ चा आहे. गांधीनगर मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा देखील उपस्थित होते. या निवडणुकीत गांधीनगरमधून प्रचाराची जबाबदारी अमित शहा यांनी घेतली. यानंतर १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातमधून निवडणूक लढविली तेव्हा निवडणूक प्रचारकाची जबाबदारी केवळ अमित शहा यांच्यावर आली.

१९९७ मध्ये गुजरातमधील सरखेज विधानसभा मतदार संघातून पोटनिवडणूक जिंकून अमित शहा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९९९ मध्ये ते अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे (एडीसीबी) अध्यक्ष म्हणून निवडले गेले. २००९ मध्ये ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष झाले

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. २००३ ते २०१० पर्यंत ते गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली, २०१२ मध्ये नरनुपारा येथून विधानसभा निवडणूक लढण्यापूर्वी त्यांनी तीन वेळा सरखेज विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. शहा यांनी राजकीय कारकीर्दीत एकही निवडणूक हरली नाही

सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या सुमारे १० महिन्यांपूर्वी, शहा यांना १२ जून २०१३ रोजी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशचं प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते, तेव्हा यूपीत भाजपाच्या लोकसभेच्या केवळ १० जागा होत्या.

जेव्हा १६ मे २०१४ रोजी सोळाव्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आले. उत्तर प्रदेशात भाजपाने ७१ जागा जिंकल्या. हा भाजपमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता. त्यानंतर अमित शहा यांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष केले. अमित शहा २०१९ मध्ये गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. ३० मे २०१९ रोजी, दुसर्‍या वेळी केंद्रात प्रचंड मतांनी भाजपा सरकार स्थापन आल्यानंतर अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

 

Article Bottom Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here