श्रीकृष्णाचे दान आणि पौराणिक कथा

0
Top Add

 

पारिजातक वृक्ष आल्यावर श्रीकृष्णाचे दान देण्याची तयारी सत्यभामेने चालविले तीने ज्योतिषाला बोलावून आणून यादानव्रताला सुमुहूर्त विचारला ज्योतिषाने माघ शुद्ध एकादशी हा दिवस पारिजातक वृक्ष गावात आणण्यात चांगला आहे तेव्हा त्या दिवशी वृक्ष आणून तू आपल्या घरी ठेव आणि पंधरा दिवसांनी म्हणजे मघ वद्य एकादशी चे दिवशी श्रीकृष्णाचे दान करू असे सांगितले त्याप्रमाणे सत्यभामेने दानाची तयारी केली व सत्पात्र ब्राह्मण म्हणून नारदाला निवडले द्वादशीच्या दिवशी सत्यभामा आपल्या परिवारासह वृक्ष आणण्याकरिता मोठ्या समारंभाने निघाली बाहेर गेल्यावर त्या वृक्षाला साष्टांग नमस्कार करून ब्राह्मणांकडून तिने त्या त्याची यथासांग पूजा केली ती हात जोडून म्हणाली हे सिंधू कुंमारा पारिजातका हे स्वर्ग रत्नकरा तुझ्या प्रसादामुळे मी व्रत करीत आहे हे तरुवरा तुझी दक्षिणा मी आपल्या हाताने ब्राह्मणाला देणार आहे तर तू माझ्या हातात राहशील असा लहान हो सत्यभामेने याप्रमाणे त्या वृक्षाची प्रार्थना करताच तो 12 योजने विस्तीर्ण असलेल्या पारिजातक वृक्ष आपले विशाल स्वरूप टाकून तुळशीच्या रोपा प्रमाणे लहान झाला सत्यभामेने तो रोपा रत्नखचित ठेवून मंगल वाद्यांच्या गजरात घरी आणला व मोठा समारंभाने तो आपल्या दाराशी लावला……

Inside Ad

सत्यभामा ब्राह्मण श्रीकृष्णाला दान देणार आहे हे वर्तमान ऐकून पुष्कळ लोकांना आश्चर्य वाटले व तो समारंभ पाहण्यासाठी हजारो लोक माघ वद्य एकादशीच्या दिवशी द्वारकेस जमले त्यादिवशी सत्यभामेने श्रीकृष्णाला सुगंधी उटणे लावून उष्णोदकाने स्नान घातले त्याला पिवळा पीतांबर नेसायला दिला अंगाला चंदन लावून बहुमूल्य अशी वस्त्रे भूषणे त्याच्या अंगावर घातली.. पारिजातक वृक्ष लावला होता त्याच्याजवळ सुवर्णाचा एक सहस्रमुखी नाग बसविला व त्या नागाची फणा वृक्षाला बांधून शिरसागर आत बसला आहे असे तिने दाखवले त्या नागावर तिने श्रीकृष्णाला आणून बसविले नंतर दान घेण्यासाठी नारदाला बोलवले आल्यावर त्याला सुवर्णाच्या आसनावर बसवले व ब्राह्मणाला बोलावून आणून संकल्प केला व त्या त्यावर दक्षिणा म्हणून तो पारिजातक स्वाधीन केला याप्रमाणे तिने ते व्रत केले तेव्हा नारदांनी तुला जन्मोजन्मी हाच पती मिळेल असा आशीर्वाद दिला पारिजातक वृक्ष व कृष्णाला बरोबर घेऊन चालले आहे तसा तर हा प्रकार पाहून बाकी स्त्रीयांना फार दुःख झाल्यावर काय करावे ते त्यांना सुचेना झाले ते दोघे द्वारकेतल्या सर्व रस्त्याने फिरत गेल्यावर नारद श्रीकृष्णाला नगराबाहेर घेऊन गेला व तेथून दुसरीकडे जाण्यास त्यांनी आपला विचार लोकांना दर्शवला…..

श्रीकृष्णाची तुला

नारद श्रीकृष्णाला घेऊन जाणार हे ऐकून द्वारकेतल्या लोकांना अत्यंत वाईट वाटले श्रीकृष्णाच्या 16000 स्त्रिया शोकाकुल झालेल्या त्या सर्वजणी एकत्र येऊन सत्यभामेच्या मंदिरात गेल्या व तिला त्या नाही नाही ते बोलू लागल्या त्या म्हणाल्या सत्यभामे तु आम्हाला कोणाला न विचारता श्रीकृष्णाला दान केले अशी त्याच्यावर तुझी एकटीच काय सत्ता होती? श्रीकृष्णाने केवळ तुझ्याशी त्या स्यमंतक मण्यासाठी विवाह केला ते तू विसरून गेलीस आमचा आत्मा असाच श्रीकृष्ण तो नारदाला दान देऊन आम्हाला दुःखात लोटण्याचा तुझा काय अधिकार तू मोठी दुष्ट घातकी व मूर्ख आहेस स्वतः होऊन आमचाही त्यांच्याशी ताटातूट केली त्यावर सत्यभामा म्हणाली

श्रीकृष्णाची खरी आवडती स्त्री मीच आहे माझ्यावर खरे प्रेम म्हणून स्वर्गातून सुरतरु आणला म्हणून तुम्ही सर्वजण श्रीकृष्णाच्या मागे लागून आला आहात ही कालिंदी तर श्रीकृष्णासाठी तपच करीत होते तर रुक्मिणी आईबापांना व विचारता पळून आली आणि तुम्ही बंदीशाळेत खितपत पडला होता तेथून मीच सुटका केली श्रीकृष्णाची खरी अर्धांगिनी मीच आहे माझी त्यांच्यावर सत्ता होती म्हणूनच मी त्याला दान दिले आता तुम्हाला कृष्ण परत पाहिजे असेल तर नारदा कडे जाऊन त्याची प्रार्थना करून कृष्णाला परत आला

सत्यभामेने यावर झुगारून सांगितल्यावर रुक्मिणी शिवाय सर्व स्त्रियांना घराबाहेर नारदाकडे गेल्या व त्यांच्याभोवती गर्दी करून म्हणाले नारदा सत्यभामा काही एकटीला श्रीकृष्णाची मालकी नाही आमची पण त्याच्यावर काही थोडी सत्ता आहेच तेव्हा आम्हा सर्वांचा जो प्राण तो श्रीकृष्ण घेऊन जाऊ नकोस याबद्दल तू सांगशील ते आम्ही तुला देऊ पण आमचे पतीरत्न घेऊ नकोस अशाप्रकारे तो सोळा हजार स्त्रियांना गोळा होऊन नारदाची विनवणी करू लागल्या..

नारदाची उडालेली पाहून श्रीकृष्ण हसू लागले शेवटी नारद म्हणाले श्रीकृष्ण तुम्हा सर्वांचा आहे पण सत्यभामेने मग मला कसा दिला ते तिला विचारा आता तुम्हाला जर श्रीकृष्ण पाहिजे असेल तर कृष्णाचे भारंभार सुवर्ण देऊन त्याला तुम्ही खुशाल घेऊन जा नारदाचे हे शब्द ऐकून सर्व स्त्रियांना आनंद झाला त्यांनी ती नारदाची अट कबूल केले त्या सर्वांनी घाईघाईने नगरात आल्या व सत्यभामेला ही गोष्ट कळवून त्यांनी तिला आपणा बरोबर घेतले सर्व स्त्रियांनी आपापले सुवर्ण अलंकार घेतले व त्या बाहेर आल्या

एका झाडाला मोठा तराजू बांधला व त्याच्या एका पारड्यात श्रीकृष्णाला बसवून दुसऱ्या पारड्यात त्या स्त्रिया आपापल्या अलंकार घालू लागल्या परंतु श्रीकृष्णाचे पारडे मुळीच जमिनीपासून हालेना सर्वांनी आपल्या जवळ होते नव्हते तेवढे सर्व सोने त्या ताजव्यात घातले परंतु सुवर्ण भाराचे पारडे वरच्या वर तरंगत होते तो प्रकार बघून सर्व स्त्रिया निराश झाल्या श्रीकृष्णाच्या शतपट सुवर्ण काजव्यात घातले तरी श्रीकृष्णाचे पारडे हलत नाही असे पाहून सर्व जणी मोठ्या विचारात पडल्या मग त्यांनी त्यांच्या पुरोहिताला विनंती केली व त्यांच्याजवळ उसने सोने घेऊन ते पारड्यात घातले तथापि पारडे वर उचलेना इतके सोनं ताजव्यात घातले तरी ताजवे वर उचलत नाही असे पाहून सर्व स्त्रिया निराश झाल्या सत्यभामेला मोठा अभिमान होता की सर्व स्त्रियांपेक्षा माझ्याजवळ सुवर्णालंकार अधिक आहेत

तेव्हा मी श्रीकृष्णाची सहज तुला करीन परंतु अंगावरील सर्व अलंकार घालूनही जेव्हा काहीच उपयोग झाला नाही तेव्हा तिचा अभिमान पार नाहीसा झाला पुढे काय करावे या विचारात या सर्व स्त्रिया गोंधळून गेलेल्या त्या सर्व स्त्रियांच्या समाजात रुक्मिणी मात्र नव्हती ती आपल्या मंदिरात हरीच्या भजनात मग्न होती अर्थात श्रीहरी तिच्याजवळ होते कृष्णाला दान केल आहे असे तिच्या ध्यानीमनीही नव्हते रुक्मिणी आलेली नाही असे पाहून सत्यभामेला वाटले की रुक्मिणीला बोलावून आणावे व तिच्याकडून तिचे अलंकार घालावे म्हणजे कदाचित तुला होईल असा विचार करून ती रुक्मिणीच्या मंदिरात आली व अभिनयाने तिला सर्व हकीकत सांगून म्हणाले बाई रुक्मिणी आता तू तरी येऊन श्रीकृष्णाची सोडवणूक कर आम्ही सर्वजणी आपणाजवळ होते नव्हते तेवढे सुवर्ण घातले परंतु ताजवे मुळीच हालत नाही

सत्यभामा ची विनंती ऐकून रुक्मिणी विचारात पडली ती मनात म्हणाली ज्याच्या उदरात सर्व विश्व सामावले आहे त्याची तुला अशा सुवर्णाचा अलंकाराने कशी होणार भक्ती वाचून त्याचे वजन करण्यात काहीही अर्थ नाही असे मनात आणून रुक्मिणीने स्नान केले परमेश्वराचे चिंतन केले व तुळशीचे एक तुळशीपत्र तोडून घेतले व जेथे श्रीकृष्णाची तुला चालली होती तेथे आली व तेथे आल्यावर प्रथम तिने नारदाला व श्रीकृष्णाला प्रदक्षिणा करून वंदन केले व पदराखाली झाकून आणलेले तुळशीपत्र अंतःकरणपूर्वक ताजव्यात घातले त्याबरोबर तुळशीपत्र घातलेले ताजवे खाली बसले व श्रीकृष्णाचा ताजवा उंच गेला तो चमत्कार पाहून सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटले रुक्मिणीला धन्यवाद देऊ लागले

श्रीकृष्णाच्या भारंभार सुवर्ण देऊन सोडून घ्यायचे होते परंतु ताजव्यात तुळशीपत्र पडल्यामुळे अलंकारांचा ताजवा कृष्णा पेक्षाही जड झाला होता म्हणून श्रीकृष्णाच्या स्त्रिया श्रीकृष्णाचे समतोल वजन करण्यासाठी आपापल्या अलंकार काढून घेऊ लागले सर्व सर्वांनी काढून घेतले तेव्हा ते कृष्णाचे वजन बरोबर झाले तो प्रकार बघून सोळा हजार स्त्रियांना दिसून आले की आपणा सर्वांना पेक्षा रुक्मिणी योग्यता फार मोठी आहे सत्यभामेलाही वाटले की आपला अभिमान फुकट होता याप्रमाणे सर्वांच्या गर्वाचे हरण झाले तेव्हा नारद म्हणाला कृष्ण ही गेला सुवर्ण ही गेले आणि माझ्या हाती तुळशीपत्र आले

हे श्रीकृष्णा तुझी ही लिला आहे ते जाणवायला कोण समर्थ आहे असे म्हणून नारदांनी श्रीकृष्णाचे चरणावर मस्तक ठेविले आणि सत्यभामेने सर्व स्त्रियांनी अभिमानाचा त्याग करून श्रीकृष्णाला अनन्यभावे नमस्कार केला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची तुला झाली……

 

Article Bottom Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here