लवकरच सुरु होणार ‘मुळशी पॅटर्न’ रिमेकचं चित्रीकरण; भाईजान दिसणार मुख्य भूमिकेत

0
Top Add

 

बॉलिवूडचा भाईजान सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच सलमानने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून तो त्याच्या आगामी चित्रपटांकडे वळला आहे. त्यामुळे आता भाईजान ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेककडे वळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Inside Ad

प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार असून सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या रिमेकचं नाव ‘गन्स ऑफ नॉर्थ’ असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता या चित्रपटाचं नाव ‘अंतिम’ असं निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

‘अंतिम’ या चित्रपटात सलमान पोलिसांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सलमानचा मेहुणा आयुष शर्मा निगेटिव्ह भूमिकेत असल्याचं पाहायला मिळणार आहे. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, ‘राधे’ चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ‘सलमान टायगर जिंदा है’च्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार होता. मात्र, काही कारणास्तव हे चित्रपट लांबणीवर पडलं आहे. त्यामुळे भाईजान आता ‘अंतिम’च्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे.

 

 

Article Bottom Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here