मैत्री कशी असावी सांगणाऱ्या श्रीकृष्ण आणि सुदामाची गोष्ट

0
Top Add

 

सुदामा या नावाचा श्रीकृष्णाचा एक मित्र होता लहानपणी श्रीकृष्ण व सुदामा असे दोघे सांदिपनी ऋषी जवळ विद्या अभ्यास करण्यासाठी होते तेथे दोघांचा अत्यंत स्नेह जमला होता पुढे श्रीकृष्ण वैभव संपन्न झाला आणि सुदामाची स्थिती पूर्वीसारखेच राहिले तो चांगला विद्वान कर्मनिष्ठ वेदशास्त्रात निष्णात होता परंतु दारिद्र्याने पूर्ण पिडलेला होता श्रीकृष्ण वैभवसंपन्न झाल्यावर एके वेळी सुदाम्याची स्त्री म्हणाली अहो तुमचा बालमित्र श्रीकृष्ण आता प्रति राजा झाला आहे तर त्याच्याकडे जा आणि काही मागून आणा म्हणजे आपला प्रपंच सुरळीत चालेल ते बोलणे ऐकून सुदामाला श्रीकृष्णाकडे जाण्याची इच्छा झाली परंतु आपण अशा दारिद्र्यावस्तेत त्याच्याकडे कसे जावे व भेट काय न्यावी याची त्याला पंचाईत पडली शेवटी त्याने मोठ्या कष्टाने तीन मुठी पोहे इकडून तिकडून मिळवून तो द्वारकेत गेला

Inside Ad

तेथे गेल्यावर दुता कडून सुदामा आल्याचा निरोप श्रीकृष्णाला पाठविला सुदाम्याचे भिकारपण पाहून हा श्रीकृष्णाचा मित्र म्हणतो याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी सुदाम्याची थट्टा केली पण सुदा म्याचा आग्रह पाहून त्यांनी श्रीकृष्णाला निरोप कळविला दुतांचा निरोप कळताच श्रीकृष्ण पटकन उठला व धावत जाऊन सुदामाला कडकडून भेटला व मोठ्या आदराने मंदिरात आणून आसनावर बसविले रुक्मिणीने उष्णोदकाने स्नान घातले व कृष्णाने षोडोपचारे पूजा करून अल्प दक्षिण नाही दिले नंतर उत्तम पक्वान्नाचे सर्वांचे भोजन झाले व तांबूल देऊन देवाने सुदामाला उत्तम शय्येवर निजविले व त्याचे पाय स्वतःचे चेपीत बसले

सर्व प्रकार पाहून सुदामाला अत्यंत धन्यता वाटली विश्रांतीनंतर कृष्ण व सुदामा बालपणाच्या गोष्टी बोलत बसले श्रीकृष्ण म्हणाले सुदामा एकदा आपण दोघांना सांदिपनी ऋषींच्या पत्नीने जळाऊ लाकडे आणण्यासाठी रानात पाठवले होते तेथे लाकडे गोळा करता करता रात्र झाली म्हणून आपण दोघे एका वडाच्या झाडाखाली निजलो त्यावेळी माझ्याजवळ पांघरायला काही नव्हते म्हणून तू आपले अर्धे धोतर मला पांघरायला दिले तसेच एकदा पाऊस पडू लागला तेव्हा आपले शरीर माझ्यावर धरून मला पाऊस लागू दिला नाहीस एकदा पाण्याची कावड आणताना थकलो म्हणून तू ती आणलीस एकदा नदीतून तू मला आपल्या कमरेवर घेऊन पलीकडे गेलास सुदामा असे कितीतरी लहानपणाचे सुखाचे दिवस आपण घालविले पण ते दिवस भराभर संपून गेले आणि असे खडतर दिवस आता आले आहेत ते ऐकून सुदामा म्हणाला श्रीकृष्णा बाबा खडतर दिवस आम्हाला आले आहे तू तर राजाप्रमाणे वैभव संपादन करून हजारो स्त्रियांसह आयुष्य भोगीत आहेस मला मात्र पोटभर खायला देखील मिळत नाही

चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे मुखोद्गत आहेत पण उपयोग काय एक पैसा सुद्धा पदरी नाही श्रीकृष्ण म्हणाले सुदामा तुझे विद्याधन हे माझ्या वैभव यापेक्षा अधिक किमतीचे आहे त्यामुळे तुझी व माझी भेट झाली व मला तू अत्यंत पूज्य वाटत आहेस असो हे मागील सर्व राहू दे पण माझ्यासाठी तू काय खाऊ आणला आहेस तो काय पाहू खाऊ चे नाव काढताच सुदामा काळजीत पडला वैभवशाली मनुष्य आपले पोहे कसे ठेवायचे याची त्याला लाज वाटू लागली तो टाळाटाळ करू लागला तेव्हा त्यातील पोहे खाऊ लागला जवळ रुक्मिणी त्यांनीही ते पाहून श्रीकृष्णाने वाटून दिले व सर्वांनी ती सुदाम्याचे तीन मोठी पोह्यांची भेट प्रेमाने खाल्ली चार दिवस याप्रमाणे श्रीकृष्णाचा पाहून चार घेतल्यावर सुदाम्याला घरची काळजी उत्पन्न झाली व त्यांनी घरी जाण्या करिता श्रीकृष्णाचा निरोप विचारला

श्री कृष्णा ने सुदामा आनंदाने निरोप दिला श्रीकृष्णासारखा वैभवसंपन्न मित्राने आपणास काहीच दिले नाही हे पाहून सुदामा खिन्न झाला आपण कृष्णाच्या भेटीला गेलो नसतो तर बरे झाले असते असे त्याला वाटू लागले विचारले तर काय सांगावे अशा चिंतेने व्यग्र होऊन मार्ग क्रमत आपल्या गावाजवळ येऊन दाखल झाला त्याचे गाव म्हणजे एक खेडे होते पण पाहतो तर द्वारके प्रमाणे दिसू लागले तेव्हा आपण चुकून पुन्हा द्वारकेला आलो की काय असे सुदामाला वाटले पण इतक्यात त्याला शहरातून येणारे काही लोक भेटले त्यांना सुदामाने हे कोणते शहर विचारले तेव्हा ते लोक म्हणाले या शहराचे नाव सुदाम नगर असे आहे

सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र असल्यामुळे श्रीकृष्णाने त्याला बांधून दिले आहे हे ऐकून सुदामाला फार आश्चर्य वाटले नंतर तो शहराजवळ आला तेथे दूत सुदामा ची वाट पाहत उभे होते सुदामा आल्याबरोबर त्याने मुजरेच केले व मोठ्या वैभवाने घरी आणले घरी त्याची बायको शृंगार करून राणी प्रमाणे बसली होती तिने सुधा बरोबर त्याला नमस्कार करून श्री कृष्णा मुळे आपल्याला एवढे वैभव मिळाले वगैरे सर्व सांगितले हा सर्व प्रकार पाहून सुदामा थक्क झाला व प्रभूच्या गुप्त देणगीचे त्यास मोठे कौतुक वाटून त्याने अनन्यभावाने देवाची प्रार्थना केली.

 

 

Article Bottom Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here