दसऱ्याला सोन म्हणून आपट्याची पाने का लुटतात… ‘जाणून घ्या’ विजयादशमी ची कथा

0
Top Add

विजयादशमी म्हणजे आपण दिवाळीच्या अगोदर जो सन साजरा करतो तो दसरा…..

Inside Ad

प्रत्येकालाच असा प्रश्न पडतो… की आपण दसरा का साजरा करतो ? याच्यामागे नेमकी काय कथा आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत दसरा साजरा करण्याची पौराणीक कथा

पूर्वी पैठण नावाच्या नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता, त्याला कौत्स नावाचा एक सुलक्षणी सुशील व सुंदर मुलगा होता. तो मुलगा प्रौढ झाल्यावर आपण वेळेत शास्त्राचा अभ्यास करावा अशी इच्छा त्यास इच्छा झाली, परंतु त्या नगरात अभ्यासाची काहीच सोय नव्हती.. म्हणून तो वरतंतु ऋषीकडे विद्याभ्याकरिता गेला. कौत्सा चा हेतू पाहून वरतंतुला आनंद झाला. त्याने सुमुहूर्त पाहून विद्या शिकवण्यास आरंभ केला.

काही दिवसांनी ब्राह्मण सर्व शास्त्रांत पारंगत झाला तेव्हा गुरूला कोणती दक्षिणा द्यावी व त्याच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे याचा विचार त्याला पडला…. एके दिवशी तो आपल्या गुरूला म्हणाला…

वरतंतू महाराज आपल्या विद्येने मी आपला अत्यंत ऋणी झालो आहे …..आपणास काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी अशी इच्छा आहे. तर आपणास कशाची आवड आहे ते सांगावे. तेव्हा ते आपणास आणून देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा गुरु म्हणाले…

बाळ कौत्सा विद्या विकणे हे कर्म अनुचित असल्यामुळे मी कोणा जवळून गुरुदक्षिणा घेत नाही. शिष्य विद्येने सुसंस्कृत झालेला पाहून गुरूला जो आनंद होतो तीच गुरुदक्षिणा होय…

गुरूला योग्य दक्षिणा न दिल्यास विद्या सफल होत नाही.. अशी कौत्साची पूर्ण भावना असल्यामुळे तो वरतंतुची परोपरीने विनंती करू लागला.. तेव्हा वरतंतू म्हणाले… हे कौत्सा जर दक्षिणा देण्याची इच्छा असेल तर मी चौदा विद्या शिकवल्या आहेत त्या प्रत्येक विद्या बद्दल एक कोटी याप्रमाणे 14 कोटी मुद्रा आणून दे पण त्या 14 कोटी मुद्रा तू एका जवळून आणून दिल्या पाहिजे.

दहा-वीस घरी भिक्षा मागून आणशील तर मी ती घेणार नाही.. अशा अटीवरच का होईना ते गुरुदक्षिणा घेण्यास कबूल झाले याबद्दल कौत्सा ला आनंद झाला व गुरूला दक्षिणा आणण्यासाठी तो निघाला….

14 कोटी मुद्रा म्हणजे काही लहान-सहान रक्कम नव्हे तेवढी रक्कम आणायची कोठून याची कौत्साला मोठी काळजी उत्पन्न झाली.. त्याने मोठ्या राजाकडे जाऊन आपली गरज कळविली परंतु 14 कोटीची रक्कम एकदम कोणीही देईना.. तो सर्व पृथ्वीवर हिंडला परंतु 14 कोटी मुद्रा देणारा आहे असा कोणीही यजमान भेटला नाही तेव्हा कौत्सास फार वाईट वाटले व गुरुदक्षिणा घेण्याविषयी आपण निष्कारण आग्रह केला असे वाटून तो चिंतेने व्याकुळ झाला अशा स्थितीत असताना त्याला एक ब्राह्मण भेटला दोघांनी एकमेकाला मनोगत कळविल्यावर तो ब्राह्मण कौत्सा ला म्हणाला अरे कौत्सा तु आयोध्येत जाऊन रघुराजाला भेट म्हणजे तुझे कार्य सहज होईल तो राजा अत्यंत दयाळू आहे तो एकटा तुला 14 कोटी मुद्रा देईल..

     . ब्राह्मणाच्या सूचनेप्रमाणे कौत्स त्या राजाकडे गेला त्या राजाने त्याचा योग्य सत्कार केला व राणीला पूजा साहित्य घेऊन बोलाविले. आज्ञा होताच ती राणी पूजासाहित्य घेऊन आली. राणी ने परिधान केलेले साधे पातळ वस्त्र, पाण्याने भरलेले मातीचे मडके व सुवर्ण ताटा ऐवजी खापराचे परण वगैरे प्रकार पाहून कौत्साची भावी आशा पार मावळून गेली अशी अवस्था त्या राजाची होती कारण असे होते की नुकताच विश्वजित यज्ञ करून त्याने सर्व द्रव्य भांडार लुटविले होते.... 

…ब्राह्मणाची पूजा केल्यानंतर राजा म्हणाला महाराज या दासाला जी आज्ञा करायची असेल ती निशंकपणे करावी…. रघुराजाचे भाषण ऐकून कौत्स ब्राह्मण दीर्घ श्‍वास सोडून म्हणाला राजा माझ्या सर्व इच्छा तुला व तुझ्या राणीला पाहून पूर्ण झाल्या दात्याची शक्ती पाहून मागणे मागावे असे शास्त्र आहे नाहीतर मागणारा मूर्ख ठरतो रघुराजा म्हणाला हे द्विजश्रेष्ठ कौत्सा आपण माझ्या स्थितीसंबंध काळजी करू नये आपली जी इच्छा असेल ती मला सांगावे आपले कार्य कितीही दुर्घट असले तरी मी करील रघु रायाने अशी विनंती केल्यावर कौत्स ब्राह्मणाने गुरुदक्षिणा वृत्तान्त सांगितला व तो म्हणाला 10 घरी भिक्षा मागून मी 14 कोटी मुद्रा मिळाल्या असत्या परंतु अशा रीतीने गोळा केलेले दक्षिणा मी घेणार नाही असे माझ्या गुरुने मला बजावून सांगितले आहे म्हणून मी तुझी किर्ति ऐकून तुझ्या कडे द्रव्य मागण्यासाठी आलो पण तुझे हे ऐश्वर्य पाहून मला पश्चाताप वाटू लागला आहे.

      कौत्स ब्राह्मणाचे निराशा मुक्त भाषण ऐकून रघुराजाला किंचित हसू आले तो त्या ब्राह्मणाला म्हणाला महाराज आपण म्हणता यात काही चूक नाही मी विश्वजीत यज्ञ केल्यामुळे हल्ली अति निष्कांचन झालो आहे तथापि मी आपल्या 14 कोटी मुद्रा लवकरच देतो त्याबद्दल आपण खात्री बाळगा असे म्हणून त्याने आपल्या प्रधानाला बोलाविले व त्याला त्या ब्राह्मणाचा हेतू कळविला तेव्हा प्रधान म्हणाला महाराज 14 कोटी मुद्रा या ब्राह्मणाला सांप्रत देणे अशक्य आहे कारण यावेळी सर्व मांडलिक राज्यांचा कारभार चुकता झाला आहे व प्रजेकडे ही जमीन महसुलात संबंधाने हप्ता घेणे राहिलेले नाही यज्ञाप्रसंगी इंद्राकडून मात्र संपत्ती आणायची राहिली होती ती त्याने यावेळी दिल्यास मात्र या बाम्हणाची इच्छा पूर्ण करता येईल. 

प्रधानाचे भाषण ऐकून रघुराजाला आनंद झाला व त्याने इंद्रावर स्वारी करण्याविषयी प्रधानाला आज्ञा केली आणि स्वारी करण्यासाठी उत्तम दिवस कोणता असे ब्राम्हणाला विचारले तेव्हा ब्राह्मणाने अश्विन शुद्ध नवमी हा दिवस सुचविला त्यादिवशी श्रवण नक्षत्र असून चंद्र मकर स्थानी होता त्यादिवशी दक्षिण दिशेने बाहेर पडून स्वारी केल्यास तुम्हाला खात्रीने यशप्राप्ती होईल असे ब्राह्मणांनी सांगितले हे वर्तमान नारदाला समजताच तो इंद्राकडे गेला व त्याने रघु राज्याची सर्व हकीकत कळविली तेव्हा इंद्राने कुबेराला बोलावून रघुराजाच्या नगरात सुवर्णमुद्रांचा वर्षाव करण्यासाठी सांगितले.

आज्ञा होताच कुबेराने अयोध्या नगराबाहेर शमी व आपट्याच्या झाडांवर सुवर्ण वृष्टी करविली इकडे आयोध्यातील लोक सुर्योदय झाल्यावर पाहतात तो शमी व आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव होऊन तेथे सुवर्णाचा मोठा पर्वत तयार झाला आहे तो चमत्कार पाहून राज्याला मोठे आश्चर्य वाटले राजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा उंटावर चढून त्या ब्राह्मणाच्या स्वाधीन केल्या व तो त्या घेऊन गुरूकडे आला व गुरुला वंदन करुन त्याने ते सर्व गुरुपुढे ठेवले परंतु वरतंतुने त्यातून 14 कोटी मुद्रा घेऊन बाकीचे परत देण्यास सांगितले ते उरलेले द्रव्य घेऊन राजाचे दूत अयोध्येला परत आले व राजा सर्व प्रकार सांगून त्यांनी ते द्रव्य पुढे ठेवले

पण राजाही त्या द्रव्याचा स्वीकार करेना त्याने ते सर्व द्रव्य कौत्सा कडे पाठवून कळविले की हे सर्व द्रव्य आपल्यामुळे प्राप्त झाले आहे तेव्हा त्या आपण ठेवावे परंतु कौत्साने राजाला उलट कळविले की राजा मला फक्त गुरुदक्षिणा पुरती द्रव्याची आवश्यकता होती तो माझा कार्यभाग झाला आहे तेव्हा आता मला यात द्रव्याचा काहीही उपयोग नाही मी वेद पठण करणारा ब्राह्मण आहे मला या मूलद्रव्याचा विटाळ नको यामुळे ते सुवर्ण कोणीच घेईना..

तेव्हा राजाने ते शमी आपट्याच्या वृक्षांवर ठेविले तेव्हापासून लोक दसऱ्याचा म्हणजे विजयादशमीचा सण पाळतात विजयादशमीच्या दिवशी अयोध्येतील लोकांनी शमी व आपटा या वृक्षांची पूजा करून ते सर्व सुवर्ण लुटून नेले व एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला शमी ही आपट्याची स्त्री आहे व ते दोघे एका शय्येवर असताना त्यांच्यावर सुवर्ण वृष्टी झाली होती म्हणून……विजयादशमीच्या दिवशी या दोन्ही वृक्षांची पूजा करून त्यांची पाने तेथील तीन मुठी मृत्तिका आणून आपल्या घरात ठेवतात. ही रघुवंशाची कथा रामायणात पंचम सर्गांत आहे…..

विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा हादिक शुभेच्छा

हा लेख आपणास आवडला असेल तर आणखी लोकांपर्यंत नक्की शेअर करा

history of vijayadashmi and dashehara
Article Bottom Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here