मागील सरकारच्या काळात प्रचंड गाजलेला प्रश्न म्हणजे नाणार तेल रिफायनरी प्रकल्प. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मोठे प्रयत्न्न केलेले होते.

0
FEATURED PROJECTS
FEATURED PROJECTS
Top Add

मुंबई: मागील सरकारच्या काळात प्रचंड गाजलेला प्रश्न म्हणजे नाणार तेल रिफायनरी प्रकल्प. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मोठे प्रयत्न्न केलेले होते. तेव्हा सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नानारची भूमिका बघता हा प्रकल्प रद्द होईल अशी सध्याची स्थिती आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत पुष्टी केली आहे कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नानारला स्थगिती देण्याचा सरकारचा विचार आहे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘नाणार नाही होणार’ असं वचन दिले असल्याचेही खासदार राऊत यांनी सांगितले. त्यासंदर्भात त्यांनी एक विडिओ जरी करू हि माहिती दिली आहे.

नानारमुळे शेतीयुक्त जमीन जाईल यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी या प्रकल्पास विरोध दर्शवला होता आणि शिवसेनेचीही तीच भूमिका होती,कारण कोंकणात शिवसेनेचा मोठा जनाधार आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पास विरोध केला होता.आता येऊन शिवसेना आणि भाजप यांच्यात वादंग होण्याची शक्यता आहे.

नाणार परिसरांत नुकताच प्रचंड जल्लोषात विजय मेळावा साजरा झाला. रिफायनरी रद्द झाल्याच्या आनंदात ज्या प्रचंड संख्येने लोक सहभागी झाले होते ते पहाता सदर प्रकल्पांबाबत जनमानस काय होते त्याचा अंदाज येतो. ह्या जनक्षोभाकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारे नव्हतेच, विशेषत: निवडणुका तोंडावर असताना. त्यामुळे भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी सदर प्रश्नांवरील मुंबईतील व स्थानिक आंदोलनात हजेरी लावली होती. शिवसेनेचे खासदार राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध करत असताना अनेक कायदेशीर मार्ग अवलंबले होते. त्यांनी यासंदर्भात संसदेतही आवाज उठवला होता. आता मुख्यमंत्र्यांनी वचन दिल्यानंतर कोकणात आनंद व्यक्त केला जात आहे.

Article Bottom Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here